Fire In Tarapur : भयंकर स्फोटानं तारापूर हादरलं ! एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग

583 0

पालघर : पालघरमधून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. यामध्ये एमआयडीसीमधील एक कारखान्यात भीषण (Fire In Tarapur) स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. स्फोटानंतर कारखान्यात आग लागली होती. आगीमुळे परिसरात धुराचे लोट दिसले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
पालघर-बोईसर तारापूर एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग लागली आहे. बारा वाजताच्या सुमारास या कारखान्यात भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कोण कारखान्यात अडकलं आहे का नाही याची तपासणी सुरू आहे.

आगीचे आणि धुराचे लोळ लांबच लांब पसरले असून नागरिकांनी मध्ये भीतीच वातावरण आहे. नागरिकांनी परिसरातून पळ काढला. यामुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!