Supreme Court

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

681 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्टोरल बॉण्डवर (Electoral Bond) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. CJI चंद्रचूड अध्यक्ष असलेल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. सरकारकडे पैसा कुठून येतो, हे जाणून घेण्याचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकांना आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय फेटाळण्यात आला आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना असंवैधानिक असल्याने ते फेटाळले जावेत, असे सर्वोच्च न्यायलायाने आपल्या निकालात म्हंटले आहे.

वेगवेगळ्या राजकीय पक्षांना जो निधी मिळतो. त्यात असमानता आहे आणि त्याच मुद्द्यावरुन एकाच पक्षाला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो, असा अहवाल समोर आला होता. त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज अखेर या प्रकरणावर सुनावणी पार पडली असून गोपनियतेच्या नावाखाली कोणताही निधी लपवू शकता येत आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राजकीय पक्षांना किती निधी मिळाला आहे हे एफडीएलाही सांगण्यात यावे. तसंच, राजकीय पक्षाना इलेक्ट्रोरल बाँडच्या नावे जो निधी दिला आहे त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. एफडीए ही सर्व माहिती देणार आहे ती निवडणूक आयोग 31 मार्चपर्यंत वेबसाइटवर जारी करेल.

इलेक्टोरल बॉण्ड योजनेला सरकारने 2018 रोजी अधिसूचित करण्यात आले होते. याच्या माध्यमातून इलेक्टोरल बॉण्ड भारतातील कोणताही नागरिक खरेदी करु शकत होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने यावर बंदी घातली आहे. तसंच, 2019 ते 2024 या पाच वर्षात ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड खरेदी केले आहेत. त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. 31 मार्च पर्यंत ही माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. एसबीआयला 12 एप्रिल 2019 पासूनचे ते आत्तापर्यंतची सर्व माहिती सार्वजनिक करावी लागणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News
error: Content is protected !!