Punit Balan

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

553 0

पुणे : खडकी येथील गुरूद्वारा श्री गुरु सिंह सभा परिसराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पुनीत बालन (Punit Balan) ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी 21 लाख रुपयांची देणगी दिली आहे. खडकी गुरुद्वारा परिसर विकासाचा एक उद्घाटन सोहळा पुनीत बालन यांच्या हस्ते आणि माणिकचंद ऑक्सिरीच्या सीएमडी जान्हवी धारीवाल-बालन यांच्या उपस्थितीत नुकताच झाला.

यावेळी पुनीत यांच्या मातोश्री इंद्राणी बालन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दगडी कोरीव नावाच्या फलकाचे उद्घाटनही बालन दापत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालन यांनी श्री गुरु सिंह सभा गुरुद्वाराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी 21 लाख रुपयांची भरीव देणगी दिली. एल्फिन्स्टन रोड, खडकी येथील हा गुरुद्वारा अतिशय जुना आहे. बालन यांनी दिलेल्या देणगीतून गुरुद्वाराच्या नूतनीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.

बालन यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा खडकीचे अध्यक्ष गैरसगुरबीर सिंग ओबेरॉय आणि व्यवस्थापन समितीने त्यांचे आभार मानले. तर पवित्र अशा गुरुद्वाराच्या नुतनीकरणाच्या कामात या देणगीच्या माध्यमातून खारीचा वाटा मला उचलता आला याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया पुनीत बालन यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!