Dhananjay Munde

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

279 0

बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या जमीन गैव्यवहार प्रकरणी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालयात हे प्रकरण सुरू होते. अंबाजोगाई अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी या प्रकरणात धनंजय पंडितराव मुंडे, वाल्मिक अण्णा कराड किंवा सूर्यभान मुंडे यांना या गैव्यवहार प्रकरणी दोषमुक्त करत क्लीन चिट दिली. तिघांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शेतकरी मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून 2018 साली धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी शेतकऱ्याची जमीन कमी पैशात खरेदी केली. मुलांना नोकरी लावतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तसेच 40 लाखांचे धनादेश वटले नाही, नोकरी लावण्याचे आश्वासन दिले असे विविध आरोप फिर्यादीकडून करण्यात आले होते.

मुंजा गित्ते व अन्य काही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून 2018 साली बरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याबाबत तपास करून अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. ते सर्व आरोप कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना क्लीन चिट दिले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News
error: Content is protected !!