Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

855 0

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे भाजपा नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश आहे.

अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपा प्रवेश केला असून आता त्यांना थेट राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने केला असून 2014 ते 2019 या कालावधीत कोथरूडच्या आमदार राहिलेल्या व 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा निवडणूक लढल्यामुळे मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती.

त्यानंतर मेधा कुलकर्णी या साईडलाईन झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचा पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रीय महिला मोर्चा चा उपाध्यक्ष देऊन पुनर्वसन करण्यात आलं होतं त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांना थेट राज्यसभेची संधी मिळाली आहे…

Share This News
error: Content is protected !!