रोहित तू बिनधास्त जा; आर आर आबांच्या लेकाला गडकरींचा शब्द

221 0

नवी दिल्ली- आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींसोबतचे फोटो शेअर करत ट्विटरद्वारे ही माहिती रोहितने दिली आहे. गडकरींसोबत भेट झाल्यावर रोहित पाटील म्हणाले की, दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणे गरजेचं आहे. ह्या वाक्याची आज प्रचिती आली.

रोहित पाटील आपल्या जिल्ह्यातील काही काम घेऊन गडकरींकडे गेले होते. तेव्हा “रोहित तू बिनधास्त जा, तू सांगितलेलं काम झालं म्हणून समज” असे धीराचे वाक्य गडकरीचें होते, असे रोहित पाटील ट्विट करत म्हणाला.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide