narendra modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सत्कार

867 0

सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज हे या सोहळ्याचे निमंत्रक असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर
फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर येण्याची शक्यता आहे. 5, 11 आणि 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जातं आहे. 5 फेब्रुवारीला जळगाव, 11 फेब्रुवारीला यवतमाळ आणि 19 फेब्रुवारीला पुणे, नागपूर असा त्यांचा दौरा असणार आहे. नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील तर नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!