Nitish Kumar

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

534 0

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या राजकारणात पुन्हा उलटफेअर झाला असून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार भारतीय जनता पक्षासोबत जात पुन्हा सरकार स्थापन करणार आहेत.

आज नितेश कुमार यांचा राजभवनात शपथविधी होणार असून नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची तर भाजपाकडून राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी आणि रेणू सिंग या मुख्य उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

2020 मध्ये बिहार विधानसभेसाठी निवडणूक झाली होती. निवडणुकीवेळी नितीश भारतीय जनता पक्षासोबत होते.या निवडणुकीत नितेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूला 45 तर भारतीय जनता पक्षाला 75 जागा मिळाल्या होत्या. पुढे 9 ऑगस्ट 2022 मध्ये नितीश यांनी काँग्रेसचा हात सोडून महागटबंधन सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि नितीश कुमार मुख्यमंत्री तर लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री झाले होते.

Share This News
error: Content is protected !!