Breaking News
Ajit Pawar

Ajit Pawar : वडिलांचं नाव चुकीचं छापल्याने अजित पवारांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं!

791 0

मुंबई : वन खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वडिलांचं नाव चुकीचं छापण्यात आलं आहे. ही गोष्ट अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. वन विभागाकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिनदर्शिका छापण्यात आल्या होत्या.

काय घडले नेमके?
या दिनदर्शिकेच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नावे छापण्यात आली. मात्र त्यामध्ये अजित पवार यांच्या वडिलांचे चुकीचे नाव छापण्यात आले. ही बाब अजित पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले. यानंतर वनविभागाने या दिनदर्शिका परत मागवल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident Video : चालकाची एक चूक अन् 7 जण ठार; थरकाप उडवणारा अपघात आला समोर

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Manoj Jarange : तुम्ही चांगली संधी गमावली… ; छगन भुजबळांनी सांगितली मनोज जरांगेची नेमकी चूक

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Share This News
error: Content is protected !!