Accident Video

Accident Video : चालकाची एक चूक अन् 7 जण ठार; थरकाप उडवणारा अपघात आला समोर

601 0

अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अनेकदा चालकाच्या एका चुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा (Accident Video) लागतो. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते याचा प्रत्यय तुम्हाला या घटनेतून येईल. ओडिशामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. सध्या या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडेल.

https://twitter.com/PTI_News/status/1750914395222294785

कसा घडला अपघात?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, रस्त्यावरुन नियमितपणे वाहतूक सुरु होती. यादरम्या सिंगल लेनमधून निघालेली एक स्कॉर्पिओ वेगाने येते. स्कॉर्पिओच्या पुढे लोकांनी भरलेली एक रिक्षा होती. तसंच विरुद्ध दिशेने एक ट्रॅक्टर जात असतो. स्कॉर्पिओ वेगात असतानाच कारचालक रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पण या प्रयत्नात समोर वेगाने येणाऱ्या दुचाकीला कार धडकते. ही धडक एवढी भीषण होती कि, स्कॉर्पिओच्या चालकाचं नियंत्रण सुटतं आणि पुढच्या रिक्षालाही धडकते. यामुळे रिक्षा पलटी होऊन रस्त्यावरुन खाली उतरते. दरम्यान घसरत जाताना स्कॉर्पिओ आणखी एका दुचाकीला उडवते.

हा सगळा अपघात फक्त 2 ते 3 सेकंदात घडतो. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता हा अपघात किती भयंकर होता ते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसर, रिक्षात एकूण 15 जण होते. अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर इतर चौघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Manoj Jarange : तुम्ही चांगली संधी गमावली… ; छगन भुजबळांनी सांगितली मनोज जरांगेची नेमकी चूक

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!