Breaking News
Chandrapur Crime

Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं ! ठाकरेंच्या कट्टर युवासेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या

1014 0

चंद्रपूर : चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चंद्रपूर (Chandrapur Crime) शहरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. उच्चभ्रू अशा सरकारनगर भागात युवासेनेच्या शहरप्रमुखावर चाकूने सपासप वार करण्यात आले. शिवा वझरकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवा वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

शिवा वझरकरची हत्या झाल्याचे समजतच त्याच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि वाहनांची मोडतोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकरचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. मित्रांशी झालेल्या वादाचे हत्येत रुपांतर झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधकार्याला सुरुवात केली आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाकडून केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Share This News
error: Content is protected !!