मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (Maharashtra Board Exam) हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 3 तास 10 मिनिटांचा असणार आहे.
10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ कशासाठी?
यापूर्वीही बोर्डाच्या परीक्षांमध्ये 10 अतिरिक्त मिनिटं ही निर्धारित वेळेच्या आधी वाढवून दिली जायची. म्हणजे 11 चा पेपर असेल तर 10.50 पासून तो सुरु व्हायचा. प्रश्नपत्रिकेचं आकलन करण्यासाठी हा वेळ वाढवून दिला जात होता. मात्र अनेक कॉपी प्रकरणं समोर येण्याचं प्रमाण हे चिंताजनक होतं. अनेकदा पेपर फुटल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यामुळेच आता बोर्डाने मागील वर्षाप्रमाणे यंदाही पेपरचा कालावधी संपल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं अधिक वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
कधी घेण्यात येणार परीक्षा?
बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग
Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट
Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता