Gadchiroli News

Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता

565 0

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही दुर्घटना घडली आहे. यामधील एका महिलेचा मृतदेह आढळून आला तर एका महिलेला वाचवण्यात यश आले तर ५ महिला अजूनही बेपत्ता आहेत.

गणपूर रै परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. 23 जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती. मात्र, ऐन मध्यात येताच नाव नदीपात्रात उलटली. त्यामुळं सहाही महिला पाण्यात बुडाल्या आहेत. या घटनेत एका महिलेचा मृतदेह सापडला असून अद्याप 5 महिला बेपत्ता आहेत. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे.

या महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे सात महिला आणि नावाडी बुडाले. मात्र नावाड्याला पोहोता येत असल्याने ते पोहत किनाऱ्यावर आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता महिलांचा शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

PM Modi : अयोध्येवरून परतताच पीएम मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Neelam Gorhe : वाईट शक्तींचा विनाश होऊन देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Shrikant Sarmalkar : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं निधन

Congress : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! ‘या’ 2 मोठ्या नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!