Pune Fire : पुण्यातील कॅम्पमधील प्रसिद्ध मॉडर्न डेअरीला आग

931 0

पुणे : पुण्यातून एक आगीची (Pune Fire) घटना समोर आली आहे. पुणे कॅम्प येथील नामांकित मॉडर्न डेअरीला सुमारे तासाभरापूर्वी आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने तातडीने कारवाई करण्यात आली. सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News
error: Content is protected !!