Shrikant Sarmalkar

Shrikant Sarmalkar : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं निधन

1349 0

मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं (Shrikant Sarmalkar) दीर्घ आजाराने निधन झालं आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत श्रीकांत सरमळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रीकांत सरमळकर हे वांद्रे खेरवाडीचे माजी नगरसेवक होते, यानंतर त्यांनी वांद्रे पूर्वमधून आमदारकीची निवडणूकही जिंकली. नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी सरमळकर नारायण राणेंसोबत गेले होते, पण 2011 साली सरमळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला.

श्रीकांत सरमळकर यांची कारकीर्द
1985 साली श्रीकांत सरमळकर नगरसेवक झाले तर 1990 साली ते वांद्रे पूर्वमधून आमदार झाले. सरमळकर नगरसेवक असताना त्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाखाली गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार नेमका कुणी केला पोलीस तपासात शेवटपर्यंत समजू शकलं नाही. मागच्या 30 वर्षांपासून सरमळकर यांच्या शरिरात या गोळ्या होत्या. त्यांच्यावर 23 जानेवारीला वांद्र्याच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एक कट्टर शिवसैनिक गेल्याने ठाकरे गटाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Congress : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! ‘या’ 2 मोठ्या नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!