Congress

Congress : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! ‘या’ 2 मोठ्या नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

581 0

जळगाव : लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्या असताना जळगावच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचे (Congress) माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षाचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गांवडे यांनी याबाबतचे पत्र जारी केले.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचं मोठं नाव आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते पक्षात सक्रीय आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. जळगाव जिल्हा व खानदेशात काँग्रेसचा प्रमुख चेहरा होते. त्यांनी नुकतीच काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती, तर त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले नव्हते.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस मुंबईतील निष्ठावंत समजले जाणाऱ्या मिलिंद देवरा यांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. त्यानंतर लगेचच उल्हास पाटील यांनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला लागोपाठ दोन धक्के बसले. पाटलांच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या वरिष्ठस्तरावर सोमवारी बैठक पार पडली. बैठकीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Share This News
error: Content is protected !!