Maharashtra Rain

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

1542 0

मुंबई : देशासह राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता (Maharashtra Weather) वर्तवण्यात आली आहे. बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पाहायला मिळणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये पहाटे कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये पहाटे कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. नाशिक, निफाडमध्ये गारठा वाढला आहे. मराठवाडा, विदर्भातही तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्रात पुढील तीन दिवसाची तुरळक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22, 23 आणि 24 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्व विदर्भात 22 जानेवारीनंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रातही पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळेल, असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!