Accident Video

Accident Video : घोडागाडी शर्यतीत ट्रॅकवर चारचाकी उलटली; अपघाताचा Video आला समोर

532 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधील (Accident Video) कागल तालुक्यातील मौजे सांगाव या ठिकाणी घोडागाडी शर्यतीवेळी मोठा अपघात झाला. घोडा गाडी शर्यतीत घोड्यांच्या मागून धावणारी चार चाकी गाडी उलटली. या थरारक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या भीषण अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय घडले नेमके?
कागल तालुक्यातल्या मौजे सांगाव या गावात रविवारी घोडागाडी शर्यत सुरू होती. घोडागाडी शर्यत पाहण्यासाठी शौकिनांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, घोडागाडी शर्यतीत घोड्यांच्या मागून एक चारचाकी गाडी धावत होती. एकेठिकाणी ही चारचाकी गाडी वळण घेताना उलटली. या गाडीवर काहीजण बसले होते. त्यापैकी काहींनी बाजूला उड्या मारल्या पण काहीजण गाडीखाली सापडले.

या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी जेव्हा गाडी उलटली तेव्हा शर्यत पाहण्यासाठी आलेल्यांनी तात्काळ धाव घेत चारचाकी गाडी बाजूला केली. त्याखाली अडकलेल्यांना लगेच बाहेर काढल्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Viral Video : बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळल्याने 4 जण जखमी

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!