आज वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांच्या विरुद्ध एका नवोदित वकिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या मुळे अट्रोसिटी कायद्या नुसार कलम 3(1) R, S, U व 3(2)(7) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

, सदर बाबत सविस्तर माहिती अशी की दि. 10/03/2022 रोजी फिर्यादी व त्यांचे सहकारी हे आशिला सोबत वडगाव मावळच्या कोर्टात कामकाज करीता गेले असता केस मधील सरकारी वकील अगरवाल यांच्यासोबत आपल्या केससंदर्भात बोलण्या साठी गेले असता फिर्यादी यांना जाती वाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली होती.


यासंदर्भात अगरवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            