उत्तराखंडमधील वृद्धेने आपली सर्व संपत्ती केली राहुल गांधी यांच्या नावावर

243 0

डेहराडून- मधील एका 78 वर्षीय महिलेने आपली सगळी संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. 50 लाखाची मालमत्ता आणि 10 तोळे सोनं असा या संपत्तीचा तपशील आहे.

पुष्पा मुंजियाल असे या महिलेचे नाव असून आपल्यावर राहुल गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. म्हणून आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर करत असल्याचं या महिलेने सांगितले. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष लालचंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने राहुल गांधी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्याकडे दिले. त्यांनी डेहराडून कोर्टात राहुल गांधी यांना मालकी हक्काचे मृत्यूपत्र सादर केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत राहुल गांधी यांच्या कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. इंदिरा गांधी असोत किंवा राजीव गांधी. देशाची एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असे त्या महिलेने सांगितल्याचे लालचंद शर्मा म्हणाले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आला आहे. गांधी परिवाराला विरोध केला जात आहे. अशावेळी राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे या महिलेने म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!