पुणे- कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेले माझी कर्मचारी यांचे राज्य सरकारने अजून दर महिन्याला पेन्शन दिले नाही. त्यामुळे विविध कर्मचारी संघटना रोज उपोषण करताना दिसत आहे. त्यात सेवा निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाने उपोषण पुण्यात गुलटेकडी येथे उपोषण केले.
या उपोषणाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी पेन्शन संघाचे अध्यक्ष दामोदर शिनगारे यांनी केले. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी पेंशन संघाचे कार्याध्यक्ष व्यंकटराव अडकसर, सचिव विष्णू दरेकर व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.