नवी मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेविकेची शिवसेना विभाग प्रमुखाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

675 0

नवी मुंबई – शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या बेलापूर येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली. या प्रकरणी प्रकाश आमटे यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मारहाण कशासाठी ?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष नवी मुंबई महापालिकेवर आहे. अलीकडेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी समर्थकांसह उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी भारती कोळी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता. भरती कोळी या भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे शिवसेना विभागप्रमुख प्रकाश आमटे यांनी या प्रकाराचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवला होता. भारती कोळी भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ वरिष्ठांना पाठवले होते. याचा राग अनावर झाल्याने भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली.

Share This News
error: Content is protected !!