Beed Accident

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

624 0

बीड : बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Beed Accident) घटना समोर आली आहे. बीडमधील मांजरसुंबा-पाटोदा या महामार्गावर कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअपमधील नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप यांचा समावेश असून कंटेनरमधील चालकासह अन्य 1 जण ठार झाले आहेत.

हा अपघात 12 जानेवारी 2024 म्हणेज शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील लिंबागणेश गावापासून काही अंतरावर असलेल्या ससेवाडी शिवारात घडला. या अपघातात प्रल्हाद सीताराम घरत (वय 63), नितीन प्रल्हाद घरत (वय 41, दोघेही रा. महाजनवाडी जि. बीड) या बाप लेकासह विनोद लक्ष्मण सानप (वय 40 रा. वाघिरा जि. पाटोदा) यांचा मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भीषण होता कि, सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकत्र अडकलेल्या वाहनांचे पत्रे काढण्यासाठी यंत्र मागवावे लागले होते. रात्री 10 वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी एक क्रेन ही आणण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे महाजनवाडी व वाघेरा गावावर शोककळा पसरली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Punit Balan : पुनीत बालन ग्रुपकडून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई वसतिगृहासाठी 14 कोटीचं अर्थसहाय्य

Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी

Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!