पुणे : प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 154 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी ‘प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता’, असे वक्तव्य केले होते. आढाव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात संतापाची मोठी लाट उसळली होती. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड यांनी हे वक्तव्य केले होते. त्यामुळे ठाणे, मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्येही आव्हाड यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना
Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी
Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू
IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार
Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय
Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार
Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले
Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण