नांदेड : नांदेडमधून (Nanded Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर कालव्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेती कामासाठी ट्रॅक्टर कालव्याच्या बाजूने जात असतांना ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने हा अपघात झाला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा तांडा शिवारात मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अजय अनिल राठोड (वय 28 वर्ष), लखन प्रकाश राठोड (वय 24 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
चाभरा तांडा येथील अजय राठोड आणि लखन राठोड हे शेतीचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन सोनाळा ते चाभरा रस्त्यावरील कालव्याच्या बाजुने जात होते. दरम्यान, अचानक चाभरा तांडा शिवारातील कालव्यात ट्रॅक्टर पडून अपघात झाला. दरम्यान, याची माहिती मिळताच परिसरातील इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली. मात्र, कालव्यात पाणी सोडलेलं असल्याने कालवा पूर्ण भरून वाहत होता. त्यामुळे दोघांना वेळेत बाहेर काढणं शक्य झाले नाही आणि दोघेही तरुण कालव्यातच ट्रकटरमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेर येताच न आल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चाभरा तांडा राहणारे अजय राठोड आणि लखन राठोड हे दोघेही ट्रॅक्टरसह कालव्यात बुडाल्याची माहिती मिळताच तातडीने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना बाहेर काढण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे
Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं
Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी
Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ
Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर
Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन
Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू
Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला
Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम
Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन
Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना