Crime

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

752 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे चक्क जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला संपवले आहे. पुण्यातील वाघोलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लोणीकंद पोलिसांनी बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करत आहेत.

मृत झालेल्या मुलीचं नाव अक्षदा फकीरा दुपारगुडे असे आहे. दुपारगुडे हे सध्या वाघोली येथे राहतात, ते मूळचे सोलापूर येथील रहिवाशी आहेत. बुधवारी दुपारी वाघोली येथे आरोपी वडिलाने मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर, पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी ससून या ठिकाणी नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत पीडित मुलीच्या मावशीच्या पतीच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत. आरोपी बाप सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन

Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!