Kamal Pardeshi

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

507 0

पुणे : उद्योग क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. छोट्याशा खेडेगावातून उद्योगाला सुरूवात करून जगभर ‘अंबिका मसाला’ ब्रँड पोहोचविणाऱ्या उद्योजिका कमल परदेशी (Kamal Pardeshi) यांचे निधन झाले आहे. त्या 63 वर्षांच्या होत्या. त्या मागच्या काही महिन्यांपासून रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. अनेक महिलांना छोटे मोठे उद्योग निर्माण करून देणारी उद्योजिका हरपल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

कमल परदेशी यांच्याविषयी थोडक्यात माहिती
शेतमजुरी करणारी महिला कोट्यवधींचा उलाढाल करणारा उद्योग उभारु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलेल्या कमला यांचा प्रवास थक्क करणार आहे. 2000 साली खुरपणीच्या माध्यमातून मिळालेल्या रोजंदारीच्या पैशांच्या आधारावर व्यवसाय सुरु करणाऱ्या कमला यांनी त्यांच्या मसाल्याच्या उद्योगाची सुरुवात झोपडीमधूनच केली. सध्या त्यांची अंबिका मसाले कंपनी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे.

जर्मनीपर्यंत पोहोचले अंबिका मसाले
सुरुवातीला कमला यांनी पुण्यातील सरकारी कार्यालयाबाहेर मसाल्यांची विक्री केली. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्राहकपेठा आणि प्रदर्शनांमधून मसाला विक्री सुरु केली. हळूहळू बिग बाझारमध्ये त्यांचे मसाले विकले जाऊ लागले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. जर्मनच्या माजी चॅन्सलर अँजेला मार्केल यांनीही कमला यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. मुंबईमध्ये नाबार्ड बँकेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात मार्केल आणि कमला यांची भेट झाली होती. आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्या या कमला यांच्या मागणीनंतर खरोखर काही आठवड्यांमध्येच अँजेला मार्केल यांच्या पुढाकाराने जर्मनीमध्ये अंबिका मसाल्यांच्या विक्रीला परवानगी मिळाली आणि विक्री सुरुही झाली.

कमल परदेशी यांचा प्रवास अत्यंत कष्टाचा राहिला. उद्योग उभारताना अनेक हालअपेष्टा त्यांना सोसाव्या लागल्या. पण त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या उद्योगासाठी कोरोना काळ प्रचंड त्रासदायक ठरला. पण तरीही त्यांनी नेटाने आपले काम सुरूच ठेवले. अनेक गोरगरीब महिलांना त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून रोजी रोटी दिली. आपल्या व्यवसायातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं त्यांचे ध्येय शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन

Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Ajit Pawar : लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!