पंढरपूर : पंढरपूरमधून (Pandharpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुभाष देवमारे असं आपल्या मुलाच्या वरातीमध्ये मृत्यू झालेल्या बापाचं नाव आहे. सुभाष देवमारे यांच्या मृत्यूमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज दुपारी लग्नसोहळा होता. दरम्यान काल रात्री नवरदेवाची हळद होती. हळदी समारंभाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. हळदी समारंभासाठी डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वर पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले.
यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला. लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलाने मोठ्या प्रमाणात हंबरडा फोडला. या घटनेमुळं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त
Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका
Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता