पुणे : केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहनचालक संघटनांकडून (Truck Driver Strike) विरोध होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल संप पुकारण्यात आला होता. यावेळी राज्याच्या विविध जिल्ह्यातील सर्व पेट्रोलियम कंपनीच्या टँकर चालकांसह वाहनचालक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. याचा मोठा फटका हा इंधन वाहतुकीला बसला आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
यासंदभार्त टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी,ऑइल कंपन्याचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची मनमाडच्या पानेवाडीमध्ये या सर्व पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी संप सुरूच आहे. त्यामुळे याठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नवीन वाहन काद्याविरोधात ट्रकचालक संघटना आक्रमक झाल्या असून, अजूनही त्यांचा संप सुरूच आहे. या संपाचा मोठा फटका हा इंधन पुरवठ्याला बसला आहे.
राज्यात काय आहे स्थिती?
कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी आणि ट्रक चालक संघटनांकडून संप पुकारण्यात आला होता. मात्र हा संप रात्री उशिरा माघारी घेण्यात आला आहे. संप मागे घेण्यात आल्यानं इंधनाची वाहतूक पूर्वरत झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सोलापूरमध्ये सध्या पेट्रोल पंप सुरळीत सुरू आहेत. मात्र संप अद्यापही मागे घेण्यात आला नसल्यानं जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणव्याची शक्यता आहे. काल पेट्रोल, डिझेल संपल्याची अफवा पसरली त्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी कोली होती. मात्र आज सकाळपासून इंधन वाटप सुरळीत सुरू आहे.
नवी मुंबईमध्ये देखील संप सुरूच आहे. संप सुरूच असल्यामुळे याचा मोठा फटका हा भाजीपाला वाहतुकीला बसला असून, आवक घटल्यानं किमती वाढण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता
Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर
Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण
Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …
Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका
Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट