Pune Crime News

Pune Crime News : भावाच्या ‘त्या’ छळाला कंटाळून बहिणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

654 0

पुणे : पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक (Pune Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. भावाला दिलेले पैसे परत मागितल्याने भावासह त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याच छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (वय 31 वर्ष, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सुनिता आणि रामेश्वर यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मजुरीचे काम करत होते. दरम्यान, सुनीता यांनी आपला भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत भावाने पैसे दिले नसल्याने ते पैसे परत मागण्यासाठी 3 डिसेंबर रोजी सुनिता या भावाच्या घरी गेल्या होत्या. मात्र, पैसे न देता भावाच्या पत्नीने त्यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. भावाच्या पत्नीने मारहाण केल्यावर त्याच दिवशी रात्री उशिरा पुन्हा सुनिता यांच्या भावाच्या पत्नीने सुनीता यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली. या प्रकरणी 4 डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी सुनीता एका सोसायटीमध्ये घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून पुन्हा बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे बहिणीने पुन्हा पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान भावाच्या याच छळाला कंटाळून सुनिता यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचे पती रामेश्वर यांनी पोलिसांत दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 डिसेंबरला भावाने आणि त्याच्या पतीने मारहाण केल्यावर, 6 डिसेंबर रोजी सुनीता सकाळी दहा वाजता ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता

Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

Prakash Ambedkar : वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? यावर प्रकाश आंबेडकरांनी केले ‘हे’ सूचक वक्तव्य

Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …

Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका

Accident News : थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर अचानक ठरलेल्या पिकनिक प्लॅनमुळे 6 मित्रांना गमवावा लागला जीव

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!