Japan Earthquake

Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

1177 0

टोकियो : वृत्तसंस्था – जपानला पुन्हा एकदा भूकंपाचा (Japan Earthquake) मोठा धक्का बसला. जपान हवामान विज्ञान एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम जपान 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला. भूकंप नोटो, इशीकावा प्रांतात आला. सोमवारी भूकंपामुळे इशीकावा प्रांतात तुस्नामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे. भूकंपाचे धक्के राजधानी टोकियो आणि कांटो या शहरातदेखील जाणवले.

इशिकावातील वाजिमा शहरात समुद्र किनारी 1 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. आतापर्यंत कोणत्याही जिवितहानीची माहिती नाही. मात्र काशीवाजाकी, निगाटा प्रांतात मोठ्या लाटा समुद्र किनाऱ्याला धडकल्या. घरे, इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. समुद्रात उसळलेल्या लाटांमुळे किनाऱ्यावर गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

जपानला 2011 मध्ये तोहोकू भूकंप आणि त्सुनामीने तडाखा दिला होता. त्यावेळी 18 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. तर हजारो लोक बेघर झाले होते. गेल्या शतकभरातला तो सर्वात विनाशकारी भूकंप ठऱला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? यावर प्रकाश आंबेडकरांनी केले ‘हे’ सूचक वक्तव्य

Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …

Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका

Accident News : थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर अचानक ठरलेल्या पिकनिक प्लॅनमुळे 6 मित्रांना गमवावा लागला जीव

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!