Bollywood Movie

Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट

819 0

मुंबई : आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood Movie) खूप खास असणार आहे. या वर्षात अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करताना दिसणार आहेत. तर हे चित्रपट नेमके कोणते आहेत चला पाहूया…

फायटर
नव्या वर्षाच्या सुरुवातीला हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या अ‍ॅक्शनचा तडका असणाऱ्या सिनेमात अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. फायटर हा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरू शकतो.

बडे मिया छोटे मिया
‘बडे मिया छोटे मिया’ या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. एप्रिल 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सिंघम अगेन
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. 200 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात अजय देवगन, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तर रणवीर सिंह आणि अक्षय कुमारची झलकही या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पुष्पा 2
अल्लू अर्जुन स्टार ‘पुष्पा 2’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होईल. या सिनेमाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्माते सध्या या सिनेमाच्या सीक्वेलवर काम करत आहेत. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

चंदू चँपियन
कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चँपियन’ हा सिनेमा जुलै 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकसह या सिनेमात श्रद्धा कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

कल्की 2989 एडी
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘कल्की 2989’ या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात प्रभाससह दीपिका पादुकोण स्क्रीन शेअर करताना दिसेल. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अ‍ॅक्शन, थ्रिलर सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …

Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका

Accident News : थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर अचानक ठरलेल्या पिकनिक प्लॅनमुळे 6 मित्रांना गमवावा लागला जीव

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!