छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये दोन ट्रकच्या अपघातामध्ये तब्बल 6 कारचा चुराडा झाला आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हा अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास वेरूळ घृष्णेश्वर मंदिर ते खुलताबाद या रोडवर घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हा अपघात झाला.
दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातानंतर दोन ट्रक दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रस्त्यालगत लावलेल्या गाड्यांवर पलटी झाले आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये सहा कारचा चुराडा झाला आहे. सुदैवानं अपघातग्रस्त वाहनातील भाविक हे दर्शनाला गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी
Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण
Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?
Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा
Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला