‘ना पवार, ना राहुल गांधी’; इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी या चेहऱ्याची चर्चा
नवी दिल्ली: इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक नुकतीच नवी दिल्लीत संपन्न झाली. या बैठकीत जागावाटप आणि 2024 साठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याली असून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले आहे.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत 28 पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. वरिष्ठ नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झाली. याशिवाय ईव्हीएम, जागावाटपासह अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, जेडीयूकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजीव रंजन सिंह, शिवसेना (उ.बा. ठा.) चे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे भारत आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीत हा प्रस्ताव मांडला. बैठकीनंतर एमडीएमकेचे खासदार वायको यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर सांगितले की, खर्गे यांच्या नावाला कोणीही विरोध केला नाही. दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून मात्र पंतप्रधान पदाच्या चर्चेबाबत अधिक निवडणुका लढू मग पंतप्रधान पदाविषयी ठरवून असं म्हटलं आहे
