यंदा IPL 2024 चा लिलाव (IPL Auction) दुबईत सुरु आहे. अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागत आहे. जे खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहेत त्यांना आपल्या संघात दाखल करून घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. अनेक संघांनी मोठ्या खेळाडूंवर बोली लावली होती. मात्र,सध्या या लिलावात एका खेळाडूची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या खेळाडूचे नाव समीर रिझवी आहे. या खेळाडूची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. मात्र चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूसाठी 8.4 कोटी रुपये मोजले आहेत. हा खेळाडू नेमका कोण आहे? अनेक तगडे खेळाडू टीममध्ये असताना चेन्नईने समीरवर का डाव लावला? याबद्दल जाणून घेऊया…
कोण आहे समीर रिझवी?
समीर रिझवी हा यूपीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. 20 वर्षीय फलंदाजाने यूपी टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले होते. युवा युवराज सिंह अशी त्याची ओळख निर्माण झाली होती. त्याने यूपी लीगमध्ये दोन शतके झळकावली आणि स्पर्धेतील केवळ 9 डावात 455 धावा केल्या. रिझवी यूपी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
देशांतर्गत स्पर्धेत समीरने उत्तर प्रदेशसाठी 11 सामन्यांत 134.70 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत. लिलावाच्या सेट-6 मध्ये त्याचा समावेश होता.यामुळे चेन्नईने त्याच्यावर कोट्यवधींची बोली लावून त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. समीर रिझवीने 23 वर्षांखालील राज्य अ स्पर्धेतही काही ठोस कामगिरी केली होती, जिथं त्यानं उत्तर प्रदेशला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर
Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या
Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार
Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड