Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

631 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील सर्वच प्रमुख घटक पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. तीन राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची एकत्र बैठक झाली नाही. बऱ्याच कालावधीनंतर ही बैठक होत आहे. तीन राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.आजच्या बैठकीत मी देखील काही गोष्टी सूचवणार आहे. वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार ? असा प्रश्न विचारला असता इंडिया आघाडीला समन्वयक चेहरा ठरवावा लागणार आहे. मात्र आमच्या कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा गेलेली नाहीये. मी नेतृत्वाबाबत कोणतंही स्वप्न पाहात नाही. मुख्यमंत्रिपद देखील मी जबाबदारी म्हणून स्विकारलं होतं. देशात लोकशाही टिकली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे यांच्यासोबतच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Pune Crime News : खळबळजनक ! फक्त एक किस दे… पुण्यात वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

Pune PMC Water Supply News : गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?

Share This News
error: Content is protected !!