Nagpur News

Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

458 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये नागपुरच्या बाजार गावातील सोलार एक्सप्लोझिव कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी 9 च्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बाजारगाव इथल्या कारखान्यातल्या या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये जाऊन याचा अंदाज घेतील. या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत. मृतांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू

Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!