अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar Crime News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये तरुण शेतकऱ्याचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह 6 जणांना एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नगर शहरापासून जवळच असलेल्या इमामपूर या ठिकाणी ही खळबळजनक घटना घडली आहे. हनुमंत आवारे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत हनुमंत आवारे या व्यक्तीचे अपहरण झाल्याचा गुन्हा गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेंडी शिवारात हनुमंत याचा मृतदेह आढळला. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. हनुमंत यांची हत्या करून मृतदेह शेंडी शिवारात टाकल्याचा आरोप मृत हनुमंत यांच्या नातेवाईकांनी केला आहे. शेतीच्या वादातून त्याचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी हनुमंत आवारेचा मृतदेह अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर हनुमंत आवारे यांची हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होणार आहे. मात्र, यावेळी हनुमंतच्या नातेवाईकांनी जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत रात्री उशीरा 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर
Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन
Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या
Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी