Anup Ghoshal

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

736 0

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं शुक्रवारी निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. अनुप घोषाल हे बऱ्याच दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. काल त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. अनुप यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

अनुप घोषाल यांना वयोमानाशी संबंधित आजारांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण शुक्रवारी त्यांचे सगळेच अवयव निकामी झाल्याने दुपारी 1.40 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या माघारी दोन मुली आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अनुप घोषाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणारे अनुप घोषाल यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झालं आहे…’ अशा भावना ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्या आहेत.

अनूप घोषाल हे अतिशय लोकप्रिय गायक होते. अनूप घोषाल यांनी हिंदी-बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांचा जन्म 1945 मध्ये अमुल्य चंद्र घोषाल आणि लबन्या घोषाल यांच्या घरी झाला. त्यांनी वयाच्या 4 व्या वर्षी तिचे संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओ, कोलकाता येथून शिशु महल या मुलांच्या कार्यक्रमासाठी प्रथम गाणं गायलं. अनुप घोषाल यांची हिंदी गाणीही खूप लोकप्रिय झाली. त्यांच्या लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नराज नहीं जिंदगी’, ‘हुस्न भी आप हैं, इश्क भी आप हैं’ आणि ‘शीशे का घर से तुम साथ हो जिंदगी भर लिए’ यांचा समावेश आहे. केवळ हिंदी आणि बंगालीच नाही तर इतर अनेक भारतीय भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली. त्यांच्या निधनामुळं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!