Rahul Narvekar

MLAs’ Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांची ‘ती’ मागणी केली मान्य

622 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना आमदार अपात्रता (MLAs’ Disqualification) प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सुनावणीचा निकाल देण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून देण्यास परवानगी दिली आहे.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या निलनंब प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा दिला आहे. राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी 10 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर यांच्यावतीनं तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Kangana Ranaut : स्मृती इराणींच्या मासिक पाळीसंदर्भातील ‘त्या’ विधानावर कंगना रणौतनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News
error: Content is protected !!