Arrest

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

402 0

पुणे : पुणे एटीएस (Pune News) पथकाने जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी एक मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी सकाळी नारायणगावात एटीएसच्या पथकाने धाड टाकली. यामध्ये त्यांनी बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत पुणे, ठाणेसह राज्यातून 15 जणांना अटक केली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुण्यात बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती पुणे एटीएसला मिळाली होती. यानंतर एटीएसने धाडसत्र राबवले. यात पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी 8 बांगलादेशी नागरिक आढळून आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. 1) मेहबुल नजरून शेख, 2) राणा जमातअली मंडल 3) गफुर राजेवली शेख 4) आलमगीर जमातअली मंडल 5) शालोम मुस्तफीजुर मंडल 6) अफजल हमिबुल खान 7) कबीर मुज्जाम मुल्ला 8) जमातअली व्हायतअली मंडल (फरार) अशी आरोपींची नावे आहेत.

हे सर्व बांग्लादेशी नागरीक कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांग्लादेश सिमेवरील मुलकी आधिका-यांच्या लेखी परवानगी शिवाय भारतात घुसले. यामुळे त्यांच्यावर परकीय नागरीक कायदा 1946 कलम 14, पारपत्र अधिनियम 1967 – नियम 3, 6, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरीक आदेश 1950 चे कलम 3 (अ) अन्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Loksabha News : लोकसभेत घुसण्यापूर्वी सागरने इंस्टाग्रामला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!