jayant Patil

Jayant Patil : कोयना धरणाचे पाणी कृष्णा नदीत सोडा; जयंत पाटलांची संसदेत मागणी

597 0

नागपूर : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यामुळं निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. कोयना धरणाचं पाणी लवकरात लवकर कृष्णा नदीत सोडण्यात यावं, अशी मागणी जयंत पाटील यांनी आज संसदेत केली. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

काय म्हणाले जयंत पाटील?
‘कोयनेतून पाणी कमी आल्यानं कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळं ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे हक्काचे 32 टीएमसी पाणी उपलब्ध करून देणं व कृष्णा नदी कोरडी न पडू देणं ही सरकारची जबाबदारी आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

‘अवघ्या 2 ते 3 टीएमसी पाण्यासाठी 32 टीएमसी पाण्यावर अन्याय करणं योग्य नाही. धरणात पाणीच नाही अशी परिस्थिती नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या भागात पाणी जातं. या काळात पाणी दिलं तर उन्हाळ्यात त्रास होत नाही. पाणी सोडलं तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. कृष्णा नदीत पाणीसाठा राहील. एप्रिल – मे महिन्यात आमच्या जिल्ह्यात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होतो. याच काळात कोकणात वीजनिर्मितीसाठी पाणी सोडलं जातं. ही वीजनिर्मिती थोडीशी कमी करून पाणी सांगली जिल्ह्याकडं वळवावं, अशी मागणी जयंत पाटील यांनी संसदेत केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

IPL Auction Live Streaming : 19 डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आयपीएलचा लिलाव

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News
error: Content is protected !!