Ravindra Berde

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

676 0

मुंबई : मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. आपल्या अनोख्या अभिनय शैलीने मराठी- हिंदी रसिकांच्या मनात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 2011 पासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते.काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. यानंतर त्यांना अचानक तीव्र हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. धक्कादायक म्हणजे 1995 मध्ये व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला होता. त्यांच्या माघारी पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

रवींद्र बेर्डे यांची कारकीर्द
रवींद्र बेर्डे यांची वयाच्या 20 व्या वर्षी नभोवाणीशी आणि 1965 च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा गाजलेल्या मराठी सिनेमांसोबत त्यांनी सिंघमसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक मराठी चित्रपट आणि 5 हिंदी चित्रपटामध्ये काम केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!