बरेली : बरेलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका रस्ते अपघातात (Car Accident) 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांनी अपघातानंतर पेट घेतला. त्यानंतर कारमधील सर्व लोकांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात हा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
बहेरी येथील रामलीला परिसरात राहणारा सुमित गुप्ता हा किराणा दुकानदार आहे. त्याने सांगितले की, नारायणंगला गावातील रहिवासी असिफ हा ग्राहक अनेकदा दुकानात येतो. त्यांनी शनिवारी सकाळी एर्टिगा कार (सीएनजी) मागवली होती. पुतण्या फुरकानला बरेली येथे एका लग्नाला जायचे होते, असे सांगण्यात आले. पूर्व ओळखीमुळे आसिफच्या सांगण्यावरून गाडी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरकान आणि इतर जण शनिवारी रात्री बरेलीतील फहम लेन येथे एका लग्नात सहभागी झाले होते. रात्री 10.15 वाजता त्यांनी कार्यक्रमातील काही लोकांना आपण घरी परतत असल्याचे सांगितले. रात्री 11 वाजता भोजीपुरा पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटर पुढे गेल्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
कारचा वेग इतका जास्त होता की ती चार लेनच्या दुभाजकाचा काही भाग तोडून पलीकडे गेली. त्याचवेळी नैनितालकडून एक डंपर येत होता. भरधाव वेगात असलेल्या कारला तो धडकला. काही सेकंदात कारने पेट घेतला. त्यात बसलेल्या लोकांनी आरडाओरड करून मदत मागितली, मात्र गाडीचे दरवाजे न उघडल्याने ते आतमध्येच अडकले. काही प्रवासी काचा फोडण्यासाठी पुढे निघाले, मात्र आगीच्या जोरामुळे गाडीपर्यंत पोहोचता आले नाही. दरम्यान, डंपरनेही पेट घेतला होता. ही भीषण परिस्थिती पाहून काही लोकांनी शेजारच्या पेट्रोल पंपावरून अग्निशमन यंत्र आणले. त्याद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. सुमारे अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कारमधील 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचादेखील समावेश आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा
Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक
Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या