महाविकास आघाडीचे आणखी 2 मंत्री अडचणीत ; अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

273 0

संजय राठोड,अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी २ मंत्री अडचणीत आले आहेत.

एका जाहिर कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी मंत्री अस्लम शेख आणि मंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंत्री अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांचे फोटो ट्विट करत काही खोचक सवाल केले होते. तलवार दाखवल्याबद्दल माझ्यावर शस्त्रास्त्र कायद्यअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता मला पहायचे आहे की या काँग्रेस नेत्यांविरुद्ध पोलिस गुन्हा नोंदवतील का? मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना विनंती करतो की त्यांनी निष्पक्ष कारवाई करावी अन्यथा तुम्ही देखील इतरांसारखेच आहात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली होती.

Share This News
error: Content is protected !!