Breaking News
Maharashtra Politics

Maharashtra Politics : निकाल 4 राज्यांच्या निवडणुकीचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

585 0

बीड : आज राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांची आज मतमोजणी पार पडत आहे. सगळीकडे याची धामधूम सुरु असताना मात्र महाराष्ट्रात (Maharashtra Politics) एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करत हे राजीनामे दिले आहेत.

बीडच्या परळी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामे दिले आहेत. बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करत नवीन तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली. यावरून नाराजी व्यक्त करत. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली.

यानंतर आज अंधारे यांच्या परळीतील होमपीच वरून तालुकाप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत आपले राजीनामे दिले आहेत. परळी व्यंकटेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप शिवसेनिकांनी केला आहे. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींना पाठवले आहेत. दरम्यान या राजीनाम्या नंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!