Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

1096 0

सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) बार्शी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने शिक्षक पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून करुन नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
अतुल मुंढे असं खून करुन आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अतुल हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.अतुल मुंडे हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह नाईकवाडी प्लॉटमध्ये राहत होते. त्यांच्या पत्नी यादेखील शिक्षिका होत्या. आज मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अतुल मुंडे यांनी पत्नी व मुलाची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासातून समोर आले आहे. अतुल मुंडे यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली नंतर पत्नीचा गळा चिरुन तिला ठार मारले व स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे.अतुल मुंढे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह बार्शी शहरात राहत होते. आज अचानक त्यांचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

IND vs AUS T20 : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका? महत्वपूर्ण सामन्यापूर्वी निम्मा संघच बदलला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!