London Misal Trailer

London Misal Trailer : भरत जाधव, गौरव मोरे यांच्या कॉमेडीचा तडका असणाऱ्या ‘लंडन मिसळ’चा ट्रेलर रिलीज

837 0

मुंबई : ‘लंडन मिसळ’ (London Misal) हा मराठी चित्रपट मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भरत जाधव (Bharat Jadhav) आणि गौरव मोरे (Gaurav More) यांच्या अभिनयाचा तडका असणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

काय आहे चित्रपटाचे कथानक?
आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा या चित्रपटामधून उलघडण्यात आली आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे कथानक घेण्यात आले आहे.

‘लंडन मिसळ’ या सिनेमात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी ‘लंडन मिसळ’ सिनेमाला संगीत दिलं आहे. तर ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे.तसेच, सिनेमाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. जालिंदर कुंभार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा येत्या 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

IND vs AUS T20 : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका? महत्वपूर्ण सामन्यापूर्वी निम्मा संघच बदलला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!