Weather Update

Weather Update : हवामान खात्याने राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट

1952 0

मुंबई : राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस (Weather Update) कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. वाढीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. भरीस आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं आता या संकटातून सावरण्याचेच प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. याबाबत हवामान खात्याकडून मोठी अपडेट समोर आली आहे.

पुढील 24 तासांसाठी (Weather Update) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळं राज्यातील काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांमध्ये वीजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

कोणकोणत्या भागांना देण्यात आला यलो अलर्ट?
राज्यात सध्या मान्सूननं माघार घेतली असली तरीही अवकाळीनं थैमान घालणं सुरु ठेवलं आहे. ज्यामुळं जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदियामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!