Nashik Crime

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

448 0

नाशिक : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढतच चालले आहे. नाशिकमधून (Nashik News) अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये चक्क जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या लेकराची सुपारी देऊन त्याचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी, शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. वणी पोलिस स्टेशन हद्दीतील लोखंडेवाडी शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर व धरणाच्या भरावाच्या दगडांवर ता. 21 रोजी दुपारी 3 ते ता.22 रोजीचे दुपारी 2 वाजेच्या दरम्यान किशोर दगु उशीर (वय 26 वर्षे, राहणार खडकजांब ता. चांदवड) याच्यावर अज्ञात आरोपीने धारधार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये किशोरचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर आरोपीने मृतदेह लोखंडेवाडी शिवार पालखेड धरणाच्या भरावाच्या आत ओढत नेवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हत्येमागचे धक्कादायक कारण आले समोर
निर्जनस्थळी खुन झाल्यामुळे कुठलाही साक्षीदार नसतांना तपास करणे पोलिसांसमोर आव्हान होते. परंतु गोपनीय व तांत्रीक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी याप्रकरणी संशयीत संदीप छगन गायकवाड (वय 30) आणि त्याचा अल्पवयीन एक 16 वर्षीय साथीदार यास ताब्यात घेतले. यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. यामध्ये त्याने मृत तरुणाचे वडील दगु जयराम उशीर (वय 57) रा. खडकजांब ता. चांदवड यांनीच सुपारी दिल्याचे सांगितलं. मयत मुलगा किशोर उर्फ (टिल्लु) हा दारु पिऊन सतत पैशाची मागणी करुन शिवीगाळ व दमदाटी करायचा म्हणुन त्या त्रासाला कंटाळुन त्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे आरोपी वडिलांनी सांगितले. त्यांनी 18 हजार रुपयांची सुपारी आरोपींना दिली होती. या प्रकरणी वणी पोलिसांनी मयताच्या वडीलांसह तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. संशयीतांमध्ये एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!